विकीने दोन महिन्यांपूर्वीही अडविले होते अंकिताला

Share This News

वर्धा : हिंगणघाट येथील प्राध्यापिका अंकिताच्या जळीतप्रकरणात १३ जणांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. बुधवारी तपासण्यात आलेल्या साक्षी-पुराव्यामध्ये अंकिलाला आरोपी विकीने घटनेच्या दोन महिन्यांपूर्वीदेखील रस्त्यात अडवून विचारणा केल्याचे समोर आले आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ही माहिती दिली.


कॉलेजमधील विद्यार्थिनी आणि दरोडा येथील विद्यार्थिनींची साक्ष या खटल्यात निर्णायक ठरू शकते. आरोपीच्या वकिलानी चार साक्षीदारांची उलट तपासणी आतापर्यंत केली आहे. एका साक्षीदारांची उलट तपासणी वेळेअभावी करणे शक्य झाले नाही. या सर्व साक्ष प्रत्यक्षदर्शी नसल्याने त्याचा विशेष फरक पडणार नाही असे आरोपीचे वकील भुपेंद्र सोने यांनी सांगितले. बुधवारी झालेल्या कामकाजात पाच साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यात नागपूर येथील शवविच्छेदन करणारे डॉक्टर, हिंगणघाटमध्ये पीडितेवर प्राथमिक उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी, पीडितेची मैत्रीण व पीडितेच्या दोन महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा सामावेश आहे. आता खटल्याची पुढील सुनावणी २० मार्चला होणार आहे. बुधवारी चार साक्षीदारांची उलटतपासणी केल्याचे ॲड. भूपेंद्र सोने यांनी सांगितले. कबुलीनामा ज्यांनी लिहिला आणि जप्ती पंचनामा करणाऱ्याची साक्ष महत्वाची ठरणार असल्याचे दोन्हीकडील वकिलांचे म्हणणे आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.