आज राज्यस्तरीय लॉकडाऊनची घोषणा?.. रात्री ८.३० वाजता कळणार

Share This News

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंगळवारी रात्री साडेआठ वाजता राज्यातील जनतेला संबोधित करणार असून यावेळी ते राज्यात कठोर लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.
राज्यात मुंबई, पुणे आणि नागपुरात परिस्थिती अधिकच गंभीर बनलेली आहे. मागील काही दिवसात कोरोना बांधितांची संख्या रोज किमान पन्नास हजाराने वाढत आहे. हा आकडा असाच वाढत गेल्यास आरोग्य सेवा कोलमडून पडतील, अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. उपराजधानी नागपुरात आताच रुग्णांसाठी संसाधनांचा तुटवडा जाणवत आहे. परिस्थिती आणखी चिघळू नये, यासाठी लॉकडाऊन लावण्याचा सल्ला राज्याच्या टास्क फोर्सने सरकारला दिला असून याबाबतची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंगळवारी रात्री राज्यातील जनतेला संबोधित करताना करण्याची शक्यता आहे. रात्री साडेआठ वाजता मुख्यमंत्री ठाकरे हे जनतेला संबोधित करणार आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.