हिरेन यांचा मृतदेह सापडल्याच्या ठिकाणावर सापडला आणखी एक मृतदेह Another body was found at the scene where Hiren’s body was found

Share This News

मुंबईः मनसुख हिरेन यांचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळून आला, तेथे आणखी एक मृतदेह आढळून आल्याने या प्रकरणातील गूढ वाढले असून या मृतदेहाचा या घटनाक्रमाशी संबंध आहे की कसे, हे अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही.
मुंब्रा खाडीजवळील रेतीबंदर येथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आला होता. तेथेच शनिवारी सकाळी एका इसमाचा मृतदेह आढळून आलाय. या इसमाचे नाव शकील सलीम अब्दुल असे असून तो ४८ वर्षे वयाचा आहे. शकील हा रेती बंदर येथीलच रहिवासी असल्याचे सांगितले जातेय. मात्र,त्याचा मनसुख हिरेन प्रकरणाशी काही संबंध आहे काय, याचा एटीएसकडून शोध सुरु आहे. त्यासाठी पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांची चौकशी सुरु केली आहे. 
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्यापुढे आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचा मालक मनसुख हिरेन यांची या घटनेनंतर काही दिवसांनी हत्या झाल्याचे आढळून आले होते. एनआयए च्या कोठडीत असलेला निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याच्यावर हिरेन यांच्या हत्येस कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.