नागपुरात आणखी एका उड्डाणपुलास मंजुरी

Share This News

नागपूर : नागपूरमधील आरटीओ चौक ते नागपूर विद्यापीठ परिसर असा उड्डाणपूल बांधण्यासाठी तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील वाडी-एमआयडीसी जंक्शन येथे चार पदरी उड्डाणपूल बांधण्याची परवानगी देण्यात आली. यासाठी ४८७.८३ कोटी रूपयांचा निधीला आज मंजुरी मिळाली.
महाराष्ट्रातील विविध रस्ते विकास प्रकल्पांसाठी केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्रालयाकडून २५०० कोटी पेक्षा अधिकाचा निधी मंजूर करण्यात आला.
केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून देशभरातील विविध राज्यातील विकास कामांसाठीचा निधीला मंजुरी दिल्याचे जाहीर केले. परळी ते गंगाखेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 F च्या अद्यावतीकरण आणि पुर्नवसन साठी २२४.४४ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमगाव ते गोंदिया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३ साठी २३९.२४ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. २८.२ किलोमीटर असलेल्या तिरोरा ते गोंदिया राज्य महामार्गाचे अद्यावतीकरण आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ यासाठी २८८.१३ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ सी वरील ३६३ किलोमीटर ते ३२१ किलोमीटरच्या दरम्यान लहान मोठे १६ पूल बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी २८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.