पुढच्या आठवड्यात आणखी एका मंत्र्याची विकेट!

Share This News

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांचा दावा

मुंबई-गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर आक्रमक झालेल्या भाजपने आता लवकरच आणखी एका मंत्र्याचा राजीनामा येणार असल्याचा दावा केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी हा दावा केला आहे.
भाजपच्या आक्रमक धोरणानंतर संजय राठोड आणि आता अनिल देशमुख या दोन मंत्र्यांचे राजीनामे आले आहेत. पुढील आठवड्यात आणखी एका मंत्र्याचा पर्दाफाश होऊन त्याचा राजीनामा येऊ शकतो, असा दावा करून चंद्रकांत पाटील म्हणाले की, हा मंत्री कोण हे मी सांगणार नाही. तुम्हीच त्याचा अंदाज घेऊ शकता.
महाराष्ट्रात आगामी काळात भाजप स्वबळावरच निवडणुका लढणार आहे. पक्षाला आता कोणाच्याही कुबड्या नको असून २०२४ मध्ये दोन कोटी मतांचे लक्ष्य निश्चित केले आहे.त्यासाठी तयारी सुरु झाली असल्याचे त्यांनी सांगितले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.