नागपूर : उंटखाना परिसरात वाहनांची जाळपोळ anti socials put cars on fire in Nagpur

Share This News

नागपूर, 03 जानेवारी : नागपुरातील उंटखाना परिसरात काही समाजकंटकांनी घराबाहेर पार्क केलेल्या वाहनांची जाळपोळ केल्याची घटना घडली. याप्रकरणी इमामवाडा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत आहेत.  यासंदर्भातील माहितीनुसार उंटखाना परिसरातील दहीपुरा ले-आऊट येथे शनिवार-रविवारच्या मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास घराबाहेर पार्क केलेल्या चारचाकी वाहनांना अज्ञात समाजकंटकांनी आग लावल्याची घटना घडली. यात एकूण 10 ते 12 वाहने पेटवण्याचा प्रयत्न झाला. त्यापैकी 3 कार पूर्णपणे जळल्या आहेत. वाहनांनी पेट घेतल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. यात काही कारचे नुकसान होण्यापासून टळले. काही कार वाचविण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. अशा घटनेत कार मधील पेट्रोल टँकचा स्फोट होण्याचा धोका असतो. मात्र नागरीकांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने अशी घटना घडली नाही. दरम्यान याप्रकरणी इमामवाडा पोलिस तपास करीत आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.