एनआयटी‘आयआयटी राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतही जागा रिक्त.

Share This News

आरक्षित जागा, प्लेसमेंटच्या अभावाचा फटका

देशातील गुणवंत विद्यार्थी ज्या संस्थेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत असतात, त्या ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था’(एनआयटी) या भारतातील अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षण संस्थेत सर्व फेऱ्या संपूनही दरवर्षी काही जागा रिक्त राहत असल्याचे वास्तव माहिती अधिकारातून उजेडात आले आहे.

‘आयआयटी’ आणि ‘एनआयटी’मध्ये प्रवेशासाठी दरवर्षी देशभरातील विद्यार्थ्यांची झुंबड उडते. यासाठी लाखो विद्यार्थी जेईई परीक्षेसाठी कठोर मेहनतही करतात. मात्र, विद्यार्थ्यांनी ‘आयआयटी’ आणि ‘एनआयटी’च्या प्रवेशासाठी एवढा आटापिटा करूनही येथील जागा रिक्त राहत असल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांची पहिली पसंती ही ‘आयआयटी’ला असते. त्यापाठोपाठ विद्यार्थी ‘एनआयटी’मध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करतात. देशभरातील ३१ ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थां’मध्ये (एनआयटी) ८ हजार ५० पदवी अभ्यासक्रमाच्या जागांसाठी प्रवेश घेतले जातात. बहूतांश ‘एनआयटी’मध्ये पहिल्या फेरीमध्ये बहुतांश प्रवेश पूर्ण होतात. मात्र, शेवटच्या फेरीनंतर शेकडो जागा रिक्त राहत असल्याचे चित्र आहे. २०१९च्या अधिकृत आकडेवारीनुसार, ३१ एनआयटीमधील ३ हजार ३३४ जागा रिक्त राहिल्या आहेत. यात देशात सर्वाधिक प्रवेश क्षमता असलेल्या रायपूर येथील एनआयटीमध्ये १६१ जागा रिक्त होत्या. याप्रमाणे उपराजधानीतील ‘व्हीएनआयटी’मध्ये ९४, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ आगरतळा २९५, कुरुक्षेत्र-९०, श्रीनगर-२२७, जालंधर- १९८, दिल्ली- ६८ जागा रिक्त होत्या. अनेक राष्ट्रीय संस्थांचे घसरत असलेले मानांकन आणि प्लेसमेंटच्या अभावामुळे विद्यार्थी ‘एनआयटी’कडे पाठ फिरवत असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.