रत्नागिरी : निर्यातक्षम आंबा बागांची हॉर्टीनेटद्वारे नोंदणी करण्याचे आवाहन

Share This News

रत्नागिरी, १२ डिसेंबर : निर्यातक्षम आंबा बागांची हॉर्टीनेटद्वारे मॅँगोनेट प्रणालीवर नोंदणी करण्याची शेवटची मुदत येत्या ३१ मार्चपर्यंत असून आंबाबागायतदारांनी त्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन कोकण विभागीय कृषी सहसंचालकांनी केले आहे.

युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यातीकरिता कृषी आणि प्रक्रिया खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाच्या (अपेडा) मॅगोनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. कोकण विभागात गेल्या आर्थिक वर्षात सात हजार ९४४ निर्यातक्षम आंबाबागांची नोंदणी झालेली आहे. अपेडाद्वारे निर्यातक्षम आंबाबागांची नोंदणी करण्यासाठी मॅंगोनेट ही ऑनलाइन प्रणाली गेल्या १ डिसेंबरपासून कार्यान्वित करण्याात आली आहे. रजिस्ट्रेशनसाठी मोबाइल अॅपही उपलब्धल करून देण्यात आले आहे. हे अॅप डाऊनलोड करुन नोंदणी सुविधा करण्यात आली आहे.
निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी पाच वर्षांसाठी वैध असेल. त्याउमुळे गेल्यावर्षी नोंदणी केलेल्याे आंबा बागांची  नव्यााने नोंदणी किंवा नूतनीकरण करण्यासची आवश्ययकता नाही. नव्यायने नोंदणी करण्यासाठी विहित नमुन्याोतील अर्ज, सात-बारा आणि आठ-अ उतारा, बागेचा नकाशा इत्यादी कागदपत्रे आवश्य्क आहेत. कोकण विभागातील सर्व आंबा बागायतदारांनी निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्यासाठई आपल्या कार्यक्षेत्रातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून विहित मुदतीत नोंदणी करण्यािचे आवाहन विभागीय कृषी सह संचालकांनी केले आहे. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.