संपूर्ण लॉकडाऊन न करता प्रभावी निर्बंध लागू करा Apply effective restrictions without a complete lockdown

Share This News

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नागपूर प्रशासनाला सूचना

नागपूर ः उपराजधानी नागपुरातील कोरोना संसर्गाची परिस्थिती गंभीर असली तरी संपूर्ण लॉकडाऊन न करता प्रभावी निर्बंध लागू करावेत. मागील अनुभव लक्षात घेऊन कोरोना रुग्णालये आणि खाटांची संख्या वाढविण्यात यावी तसेच स्वतंत्र कोरोना रुग्णालये राखीव ठेवावी, अशा सूचना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरात पालकमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत केल्यात. 
नागपुरातील परिस्थिती गंभीर आहे. राज्यातील ५० पैकी ३० मृत्यू नागपुरातच झाले आहेत. त्यामुळे तातडीने गंभीर उपाययोजना करण्याची गरज आहे. संपूर्ण लॉकडाऊन हा त्यावर पर्याय नाही. त्यामुळे लोकांचे नुकसान होत असून असंतोषही वाढत आहे. त्याऐवजी प्रभावी निर्बंध लागू करण्याची पुढे आलेली मागणी अतिशय योग्य आहे. त्यांची अंमलबजावणी कठोरपणे झाली पाहिजे. गृह विलगीकरणात असलेले लोक रस्त्यावर फिरत आहेत. त्यांना उचलून विलगीकरण कक्षात नेण्याची कारवाई केली पाहिजे. कॅमेरांच्या मदतीने बाहेर फिरणाऱ्या लोकांची ओळख पटवून कारवाई करायला हवी, असे फडणवीस म्हणाले.
कार्यालयांची बुकींग बंद आहेत. ते रद्द केल्याने लोकांचे पैसे मिळत नाही. त्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसीजर निश्चित केली पाहिजे. कोरोना रुग्णालयांची संख्या आणि खाटांची संख्या तातडीने वाढविली पाहिजे. स्वतंत्र कोव्हीड रुग्णालये देखील सज्ज ठेवली पाहिजे. रुग्णालयांच्या बिलांवर देखील देखरेख अपेक्षित असून त्यांचे अंकेक्षण झाले पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे कामांचा वेग वाढविण्याची गरज आहे, असेही फडणवीस म्हणाले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.