भारत सरकारतर्फे प्रवीण किडेंची राष्ट्रीय गुणवत्ता मॉनिटर्स पॅनलवर नियुक्तीAppointment of Praveen Kide on National Quality Monitor Panel by Government of India

Share This News

सचिव, मुख्यमंत्री, , ग्रामसडक योजना, ग्रामविकास विभाग या पदावरून नुकतेच निवृत्त झालेल्या श्री . प्रवीण मधुकर किडे यांची भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या , राष्ट्रीय ग्रामीण पायाभूत विकास संस्थेच्या पॅनलवर राष्ट्रीय गुणवत्ता मॉनिटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय राजमार्ग अभियंता अकादमी द्वारे आयोजित आणि राष्ट्रीय ग्रामीण पायाभूत विकास संस्थे द्वारे प्रायोजित प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत *राष्ट्रीय गुणवत्ता मॉनिटर्स पॅनेल साठी घेण्यात आलेल्या ओरिएंटेशन प्रशिक्षण कार्यक्रमातून निवड होवून ही नियुक्ती करण्यात आली आहे. ओरिएंटेशन प्रशिक्षण कार्यक्रमात दुसऱ्या बॅचमधून महाराष्ट्रातून फक्त दोघांचीच निवड झाली आहे त्यातील प्रवीण मधुकर किडे हे एक आहेत हे विशेष तसे प्रमाणपत्र त्यांना प्रदान करण्यात आले आहे.


या प्रशिक्षणातील पहिल्या बॅचमधून कुणाचीही निवड करण्यात आलेली नव्हती. संपूर्ण देशात राबविण्यात येणाऱ्या *प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसाठी
राष्ट्रीय गुणवत्ता मॉनिटर म्हणून काम करताना राष्ट्रीय ग्रामीण पायाभूत विकास संस्था (NRIDA) कडून दरमहिन्याला एक राज्य ,त्यातील दोन जिल्ह्यातील काम तपासणीसाठी देण्यात येणार आहे. जम्मू आणि काश्मीर हे पहिले राज्य श्री. किडेंना देण्यात आले आहे. बीई ला द्वितीय मेरीट, एम ई ला प्रथम मेरीट आणि एमपीएससीच्या परीक्षेत महाराष्ट्रातून दुसरे मेरीट आलेले प्रवीण किडे हे 23 व्या वर्षी क्लास वन ऑफीसर झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागात उप अभियंता , कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंता ते सचिव असा यशस्वी प्रवास त्यांचा राहिलेला आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या पदाव्यतिरिक्त अनेकदा अतिरिक्त कार्यभार त्यांनी सांभाळत जबाबदारी यशस्वीपणे पेलली आहे. नागपूर मेट्रोचे कामकाज ही त्यांंनी पाहिलेले आहे. मुळचे अकोल्याचे असलेले पुणे रहिवासी किडे हे सर्व प्रथम मुंबई चेंबूर नंतर , कोकणभवन,साकोली ,अहमदनगर, चंद्रपूर, नागपूर, औरंगाबाद, पुणे व पुन्हा मुंबई मंत्रालय या ठिकाणी कार्यरत होते.
राष्ट्रीय पातळीवर श्री. प्रवीण किडेंची नियुक्ती होणे ही समस्त महाराष्ट्रवासियांसाठी गौरवास्पद, अभिमानास्पद बाब आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.