अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्यास अटक

Share This News

१२ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

खापा
खापा पोलिसांनी गोसेवाडी परिसरात कन्हान नदीवर अवैध रेतीची वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या आधारे खापा पोलिसांनी त्या परिसरामध्ये जाऊन पाहणी केली असता तेथे विना रॉयल्टी वाहतूक करताना एक ट्रक पकडला तसेच चालकासही अटक करण्यात आली. ट्रक व रेती असा १२ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई गुरुवारी दुपारी करण्यात आली.
सावनेर तालुक्यातील कन्हान नदीवरील गोसेवाडी परिसरातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती खाप्याचे ठाणेदार अजय मानकर त्यांना मिळाली,

त्यानुसार पोलिसांनी या भागाची पाहणी केली. या पाहणीत (एम.एच. ४0 एन. ७५७७) ट्रक थांबून झडती घेतली त्या ट्रकमध्ये रेतीची आढळून येताच कागद पत्रांची तपासणी केली. ती रेती विना रॉयल्टी असल्याचे चौकशी स्पष्ट होताच पोलिसांनी चालक-मालक दीपक पुरुषोत्तम पंचवटे (३५) व पवन धनकर दोघेही रा. महादुला यांना अटक केली. त्यांच्याकडून रेती आणि ट्रक असा एकूण १२ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार अजय मानकर यांनी दिली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.