आरोग्यम् धनसंपदा | Asafoetida is widely used

Share This News

हिंग

हिंगुष्ण पाचनं रुच्यं तीक्ष्णं वातबलासह्त् l
शूलगुल्मोदरानाहक्रीमिघ्नं पित्तवर्द्धानम् l

स्त्रीपुष्पजननं बल्यं मूर्च्छापस्मारहत्परम् l l भा प्र

वरणात तडका द्यायचा असो किंवा भाजी सातडायची असेल तर हिंगाचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो.तसेच पचायला जड पदार्थ म्हणजे कढी ,पकोडे किंवा बेसनाच्या विविध पदार्थ यामध्ये हिंगाचा तडका दिल्याने न केवळ पदार्थाचा स्वाद वाढतो तर हे पदार्थ सुपाच्च्य सुद्धा होतात. सहस्त्रवेधी ,जतुक,बल्लिक ,उग्रगंध ,रक्षोघ्न अशी नवे आयुर्वेदात हिंगासाठी आली आहेत.हिंग हि दोन प्रकारची असते श्वेत आणि कृष्ण .श्वेत हिंग ला हिरा हिंग असेसुद्धा म्हणतात कारण याचा निर्यास हा सुगंधी ,पांढरा आणि चमकदार असतो.तर कृष्ण प्रकार दुर्गंधी युक्त असतो. आपण स्वयंपाकाकरिता जो हिंग वापरतो त्यामध्ये व्यापारी आपापल्या फॉम्र्युलाप्रमाणे मूळ हिराहिंगात भेसळ करून विकतात. कारण मूळ हिराहिंग खूपच कडू असतो. आणि ती नेहमीच्या स्वयंपाकात वापरताच
येणार नाही. मात्र हि हिरा हिंग अनेक औषधी गुणयुक्त असल्याने आयुर्वेदात औषध म्हणून या हिरा हिंगाचा च वापर करतात.हिंग हि रसाने कटू ,विपाकाने कटू आणि वीर्याने उष्ण असून लघु ,स्निग्ध आणि तीक्ष्ण गुणाची आहे.हि उत्तम कफ –वात शामक आहे. हिंग उत्तम अग्नी दीपन ,पचन करणारी आहे आणि आहाराला रुची आणणारी आहे.तिच्या स्निग्ध आणि तीक्ष्ण गुणाने अनुलोमन आणि शुलनाशक आहे.त्यामुळे अग्निमांद्य ,पोटातील वायू ,पोट दुखी,पोटातील गुल्म ,बद्ध कोष्ठता या सर्व विकारात हिंगाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.साधा हिंगाचा कणभर खडा मिठाबरोबर घेतला तरी कसल्याही प्रकारचे अजीर्ण दूर होत असते.

हिंग वातानुलोमक आहे. आमाशयात वा पक्काशयात वायू अडला असो, हिंग लगेच वायू मोकळा करतो.तसेच समान आणि अपान वायूचे अनुलोमन हिंग घडवून आणते त्यामुळे शूल नष्ट होते.आपल्या गुण –विपाकाने हिंग पोटातील कृमिचा नाह करते.म्हणून लहान मुलांना पोटात कृमी होऊ नये आणि घेतलेल्या दुधाचे पचन नित व्हावे आणि पोटात गौसेस होऊ नये यासाठी त्यांच्या जन्मघुटीत हिंग उगाळून देण्याची पध्दत आहे. पोटात गौसेस झाल्यास किंवा उदरविकारात हिंगाचा लेप पोटावर करतात किंवा हिंगाची पुरचुंडी करून उदर भागी शेकतात. पोटातील कृमी मध्ये हिंग जलाचा बस्ती दिल्याने खूप लाभ मिळतो. साधी हिंग भाजून त्याची कढी किंवा ताक घेतल्याने हि पोटाच्या विकारात शमन मिळते.हर्निया, पोटदुखी, पोटफुगी, आमांश, जंत, अन्न कुजणे या तक्रारींत हिंग, मीठ, लसूण व गरम पाणी असे मिश्रण नियमित घेतल्याने फायदे मिळते. वायुगोळा किंवा पोटातील वातज गुल्म या विकारांत हिंग आल्याच्या रसाबरोबर घ्यावा. लगेच आराम पडतो.बध्दकोष्ठ मध्ये हिंगामध्ये थोडा सोडा टाकून झोपण्या अगोदर घेतल्यास सकाळी पोट साफ होते.भूक लागत नसल्यास जेवणा अगोदर तुपात भाजलेले हिंग आणि अदरक चा तुकडा घेतल्याने
भूक चांगली लागते.वारंवार येणाऱ्या उचकी साठी हिंग आणि उडीद डाळ कोळश्यावर टाकून त्याचा धूर घेतल्याने उचकी चा त्रास कमी होतो.उकळलेल्या पाण्यामध्ये हिंग टाकून त्या पाण्याची चूल भरल्यास दातदुखी थांबते.कीड लागलेल्या दातांमध्ये थोडी हिंग गरम करून त्या ठिकाणी ठेवल्यास कीड नष्ट होण्यास मदत होतो. हिंग हे कफघ्न म्हणजे दुष्ट कफाचा नाश करणारी आणि कफ नि:सारक आहे त्यामुळे प्राणवह स्त्रोतासामध्ये कफामुळे उत्पन्न झालेला अवरोध दूर करून मार्ग मोकळा करते.जीर्ण खोकला,दमा ,डांग्या खोकला यामध्ये छातीवर हिंगाचा लेप केल्याने फायदा मिळतो किंवा अश्या अवस्थेत हिंग,आले हे मधाबरोबर घ्यावी.तर सर्दी, पडसे, अर्धशिशी या विकारांत हिंगाचे पाणी तारतम्याने नाकात टाकलयास लाभ मिळतो. डोके दुखी मध्ये आराम पाण्यात हिंग टाकून घेतल्याने लाभ मिळतो.वायुगोळा किंवा पोटातील वातज गुल्म या विकारांत हिंग आल्याच्या रसाबरोबर घ्यावा. लगेच आराम पडतो.

स्त्रियांना होणाऱ्या मासिक धर्मातील त्रासात हिंग अत्यंत गुणकारी औषध आहे.अनियमित मासिक धर्म ,मासिक धर्माच्या वेळी असणारी विविध दुखणी,होरारे अत्याधिक रक्त स्त्राव या सर्वांमध्ये हिंगाचा वापर लाभदायी ठरतो.तसेच प्रसूती नंतर गर्भाशय शोधानार्थ हिंगाचा वापर होतो. हिंग उष्ण आणि तक्ष असल्यने वाजीकरण म्हणून क्लैब्यात उत्तेजक म्हणून उपयोग होतो. पुरुषांच्या हर्निया अंडवृद्धी या विकारांत हिंग-लसुणादी तेल मोठेच योगदान देते. एक भाग हिंग, तीन भाग सैंधव, नऊ भागएरंडेल तेल व सत्तावीस भाग लसणीचा रस असे एकत्र मिश्रणाचे आटवून सिद्ध केलेले तेल हर्नियाकरिता एकदम अफलातून औषध आहे.  हिंग हि उष्ण आणि तिक्ष गुणाची असल्यने उत्क्लेश ,दह ,छर्दी इत्यादी पित्त प्रकोपाची लक्षणे उत्पन्न होऊ शकते अश्या वेळी दडीम ,सौन्फ ,चंदन ,सफरचंद यांचे सेवन करावे.
डॉ. निलेश खोंडे


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.