आपसी वादावरून प्राणघातक हल्ला

Share This News

उमरेड : स्थानिय नवेगाव साधू हे गाव उमरेडपासून ५ किमीच्या अंतरवर असून, या एकाच गावात राहणार्‍या दोन युवकांमधून आपसी वादावरून सोमवारी (२५ जानेवारी) रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास आरोपी प्रदीप मधुकर कन्नाके, रा. नवेगाव साधू या युवकाने त्याच्याच गावातील राहणार्‍या राकेश धनराज कुंभरे (वय २१) या युवकासोबत जुन्या वादावरून भांडण करून आपल्या घरची कुर्‍हाड आणुन राकेशच्या डोक्यावर, उजव्या खाद्यांवर व हातावर मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा राकेश कुंभरे यांच्या तक्रारीवरून आरोपी प्रदीप कन्नाके यांच्याविरुद्ध उमरेड पोलिस स्टेशनला कलम ३0७ भा.दं. वि.नुसार गुन्हा नोंद करून आरोपीला अटक करण्यात आली. पुढील तपास स.पो. निरीक्षक नितेश डोर्लिकर करीत आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.