चिमूरच्या कोविड सेंटरला १0 जम्बो ऑक्सिजन सिलिंडरची मदत

Share This News

चिमूर तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या व वाढता मृत्यूदर त्यात जिल्हा प्रशासन यांच्याकडे ऑक्सिजनची मागणी करूनही विलंब आणि त्यातही कमी पुरवठा होत आहे. ऑक्सिजन न मिळाल्याने अनेक गंभीर रुग्णांचा मृत्यू ओढवतो. चिमूर भागातील रुग्णांसोबत आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेता त्यावर उपायोजना म्हणून चिमूर येथील कोविड रुग्णांना उपचारासाठी इतरत्र कुठेही भटकावे लागू नये, गावातच उपचार घेता यावा व रुग्णांची गैरसोय होऊ नये याकरिता चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडिया यांच्या माध्यमाने स्व:खर्चाने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. आ. भांगडिया यांनी नुकतेच चिमूर उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटरला १0 जम्बो ऑक्सिजन सिलिंडरची मदत करण्यात आले आहे.
चिमूर येथून प्रत्येक जिल्ह्य मुख्यालय व जिल्हा आरोग्य यंत्रणांचे अंतर १00 की.मी.पेक्षा अधिक आहे. यातच कोरोनाच्या रुग्णांची प्रकृती चिंताजनक होताच किंवा वैद्यकीय सुविधांचा अभाव निर्माण होताच रुग्णांना बाहेर ठिकाणी हलविल्याशिवाय पर्याय नसतो. आधीच सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. उपलब्ध झालेला ऑक्सिजनचा साठा पूर्ण वेळ पुरत नसल्याने अतिगंभीर समस्या निर्माण होऊन रुग्णांच्या जीवितास धोका उद्भवू शकतो. हे लक्षात घेता आधीच पूर्वतयारी ठेवून तातडीने १0 जंबो ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था आ. कीर्तिकुमार (बंटी) भांगडिया यांनी स्वखर्चातून करून दिली असून, चिमुर तालुक्यातील रुग्णांना इतरत्र कुठेही न जाता इथेच उपचार घेता येईल. नागरिकांनीसुद्धा कोरोना आटोक्यात आणण्यासाठी यंत्रणेस सहकार्य करण्याचे आवाहन आ. भांगडिया यांनी केले आहे.
उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.भगत यांना हे सर्व जंबो ऑक्सिजन सिलिंडर सुपूर्द करण्यात आले. त्यासोबत नागभिड येथेही लवकरच काही ऑक्सिजन सिलिंडत पोहोचतील असे नियोजन केले आहे. यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते राजू देवतळे, एकनाथ थुटे, युवा नेते भाजपा चिमूर समीर राचलवार, टीमू बलदुवा, विक्की कोरेकार आदी उपस्थित होते.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.