पटगोवारीत मुलाने केली दारूड्या पित्याची हत्या

Share This News

रामटेक
मनसर-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पटगोवारी येथे शनिवार, १९ डिसेंबरला संध्याकाळी ७.३0 च्यादरम्यान रोहित गणपत चिंचूरकर या बावीस वर्षीय तरुणाने आपल्या जन्मदात्या पित्याच्या डोक्यात कुर्‍हाड घालून खून केल्याची घटना घडली.
सविस्तर वृत्त असे की, साठ वर्षीय मृतक गणपत डोमा चिंचूरकर दारू पिले की घरी पत्नी व मुलाला शिव्या द्यायचे. याचा मुलाच्या मनात खूप राग होता. बाप दारू पिऊन झोपलेल्या अवस्थेत असताना मुलाने वडिलांच्या डोक्यात कुर्‍हाड घातली. त्यात त्यांचा मेंदू बाहेर आला. उपजिल्हा रुग्णालय, रामटेक येथे आणल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नयन अलूरकर, पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्‍वर, सहायक पोलिस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे व पोलिस रुग्णालयात तसेच घटनास्थळीही दाखल झाले. रोहित गणपत चिंचूरकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, भादंवि ३0२ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नयन अलूरकर करीत आहे.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.