ग्रुपमधून काढल्याच्या रागात अॅडमिनवर केला हल्ला

Share This News

Attack on admin in anger for being removed from group

नागपुर : काही दिवसांपूर्वी मेसेजवर आक्षेप घेतल्याने व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकले. या रागातून दोघांनी ग्रुप अॅडमिनवर प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपुरात महापालिका कार्यालयाजवळ हा प्रकार घडला.

 व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकल्याने अॅडमिनवर हल्ला करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चंद्रमणी यादव (५०, सिंधी कॉलनी, वैशालीनगर) आणि छत्रपती यादव (४९) अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ६च्या सुमारास सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेश्राम पुतळा चौक परिसरात घडली.

सुनील करमचंद अलीमचंदानी (मेश्राम पुतळा चौक, सदर) असे या प्रकरणातील फिर्यादीचे नाव आहे. सुनील आणि चंद्रमणी हे दोघेही महापालिकेत कंत्राटदार आहेत. सुनील यांनी यांनी दोन व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केले आहेत. यात आरोपी चंद्रमणी यादव आणि छत्रपती यादव हे दोघेही होते. मात्र, या दोघांनी काही दिवसांपूर्वी काही मेसेजवर आक्षेप घेतला. यामुळे सुनील यांनी दोघांनाही दोन्ही ग्रुपमधून काढून टाकले. रागाच्या भरात आरोपींनी सुनील यांना फोन करून महापालिकेच्या कार्यलयाजवळ बोलावले. तेथे त्यांच्यावर छन्नीने प्राणघातक हल्ला केला. दोन्ही आरोपी अद्याप फरार आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.