अविनाश ठाकरे नागपूर मनपाचे सत्तापक्ष नेते

Share This News

नागपूर : महापालिकेतील सत्ताकारणात बदल करण्यात आला आहे. भाजपचे अनुभवी नगरसेवक व स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश ठाकरे यांची महापालिकेच्या सत्तापक्षनेतेपदी भाजपने निवड केली आहे. महापालिका निवडणुकीला वर्षभराचा कालावधी उरला असताना हा बदल करण्यात आला आहे. विद्यमान सत्तापक्षनेते संदीप जाधव यांनी शनिवारी व्यक्तिगत कारणांमुळे राजीनामा दिला.
अविनाश ठाकरे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. काही वर्षांपासून ते महापालिकेत थोडे अलिप्त होते. त्यांच्याकडे पक्षाच्या ओबीसी सेलची जबाबदारी सोपविण्यात आली होती.अदेवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांच्या नावाला संमती दिल्यानंतर हा बदल करण्यात आला. शहराध्यक्ष व आमदार प्रवीण दटके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ठाकरे यांच्या नावाची घोषणा केल्याचे पक्षातर्फे कळविण्यात आले आहे. दरम्यान विद्यमान स्थायी समिती सभापतींचा कार्यकाळ संपत असल्याने नव्या सभापतींची लवकरच निवड होणार आहे. यंदा या पदाची जबाबदारी पक्षातील ज्येष्ठ महिला नगरसेविकेकडे देण्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नगरसेविकांची यासाठी लॉबिंग सुरू आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.