नागपूर : नव्या शिक्षण धाेरणाविराेधात आजपासून जागृती अभियान Awareness campaign against new education concept from today
सावित्रीबाइ फुले यांच्या जयंतीदिनी ३ जानेवारीपासून ते गणतंत्र दिवस २६ जानेवारीपर्यंत राज्यभर हे अभियान राबविण्यात येणार आहे. केंद्राचे नवीन शिक्षण धाेरण जातीयता बळकट करणारे, भगवेकरण करणारे, शिक्षणाचे बाजारीकरण करणारे, अंधश्रद्धेचा प्रसार करणारे, स्त्रियांच्या शिक्षणात बाधा आणणारे, संविधानिक आरक्षणाला तडा देणारे आणि धर्मनिरपेक्षतेला हरताळ फासणारे असल्याची टीका अशाेक सरस्वती यांनी केली. या २३ दिवसांत राज्यात ५०० सभा तसेच २३, २४ व २५ जानेवारीला सत्याग्रह आंदाेलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यात २५ सभा तसेच शहरातील ६ झाेन व जिल्ह्यात १३ तालुक्यांत १९ सत्याग्रह आंदाेलन हाेईल. २५ जानेवारीला संविधान चाैकात रास्ता राेकाे आंदाेलन हाेइल. पत्रपरिषदेला रमेश बिजेकर, प्रा. घनश्याम धाबर्डे, अरुण लाटकर, बबन चहांदे, युगल रायलू, उज्ज्वला गणवीर, सुषमा कळमकर, तन्वी रहेमत, यशवंत वासनिक उपस्थित हाेते.