आयुर्वेदिक कॉलेजमध्ये होणार १00 खाटांचे कोविड रुग्णालय

Share This News

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये बाधितांना खाटा कमी पडत आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी जास्तीत-जास्त बेड्स कसे उपलब्ध करता येईल, यासाठी महापौर दयाशंकर तिवारी प्रयत्न करीत आहे. मंगळवारी (२0 एप्रिल) त्यांनी भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक हॉस्पिटल अँण्ड रिचर्स सेंटर के.डी.के. कॉलेजचा दौरा केला. त्यांनी या रुग्णालयात १00 खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी ऑक्सिजन लाईन टाकण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले.
महापौरांनी यापूर्वी आयुर्वेदिक महाविद्यालय व पकवासा समन्वय रुग्णालयाचा दौरा करून १३६ खाटांचे रुग्णालय उघडण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिले होते. महापौरांनी सांगितले की शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयांना कोविड रुग्णांसाठी वापरण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुळक आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयात ऑक्सिजनची १00 खाटांची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. महापौरांनी सांगितले की पुढच्या दहा दिवसांत ही सगळी व्यवस्था पूर्ण करण्याचे प्रयत्न तज्ज्ञ चिकित्सक, नर्सेसची व्यवस्था मनपातर्फे करण्यात येणार आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनीसुद्धा त्यांचा प्रयत्नाला साथ दिली आहे. यावेळी महापौरांसोबत वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती महेश महाजन, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, कॉलेजच्या प्राचार्य डॉ. मीना अलनेवार, आर.एम.ओ.डॉ. संगीता भागडकर, समन्वयक डॉ. शरद त्रिपाठी, उपायुक्त (महसूल) मिलिंद मेर्शाम, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.सुनील कांबळे आदी उपस्थित होते.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.