नागपुरात बी.एडचे पेपर पुढे ढकलले

Share This News

नागपूर : कोरोनारुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बी.एड. परीक्षेचे उरलेले दोन पेपर पुढे ढकलले आहेत. याबाबतचा निर्णय बुधवार, २४ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आला.
नागपूर विद्यापीठांतर्गत बी.एड. अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येत होत्या. अशात दीक्षाभूमी परिसरातील डॉ. आंबेडकर कॉलेज येथे सुमारे ६०० विद्यार्थी ही परीक्षा देणार होते. मात्र या कॉलेजमध्ये १२ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झालेत. त्यामुळे बी.एड. परीक्षेचे केंद्र असलेले डॉ. आंबेडकर कॉलेज रद्द करून दुसऱ्या कॉलेजमध्ये द्यावे काय याबाबत विचार सुरू होता. मात्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशीच स्थिती आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अनेक शाळा-कॉलेज, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस बंद करण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी बी. एडचे उरलेले दोन पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय नागपूर विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. बुधवार आणि शुक्रवार या दोन दिवसात हे पेपर होणार होते. मात्र ऐनवेळी पेपर रद्द करण्यात आल्याचा निर्णय घेतल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी दिली


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.