बाबरी प्रकरणी निर्दोष सिद्ध झाल्यानंतर आडवाणींच्या घरी नेत्यांची रीघ, रविशंकर प्रसादही पोहोचले

Share This News

Babri Masjid Demolition Verdict Updates: लखनऊच्या सीबीआय कोर्टाने बाबरी विध्वंस प्रकरणी भाजपचे वयोवृद्ध नेते लालकृष्ण आडवाणी और मुरली मनोहर जोशी, उमा भारतींसह सर्वच ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

नवी दिल्ली: बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी (babri masjid demolition case) भारतीय जनता पक्षाचे वयोवृद्ध नेते ,लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्वच ३२ आरोपींची लखनऊच्या विशेष सीबीआय कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालानंतर भारतीय जनता पक्षात आनंदाचे वातावरण आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या ज्येष्ठ नेत्यांचे अभिनंदन केले आहे. तर कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी या निकालानंतर लागलीच आडवाणी यांच्या निवासस्थानी भेट दिली.  दिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ) यांनी उशिरा का होईना, पण न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

‘उशिरा का होईना, पण न्याय मिळाला’

बाबरी विध्वंस प्रकरणातील सर्व ३२ आरोपी निर्दोष सिद्ध झाल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आनंद व्यक्त केला आहे. हा न्यायाचा विजय असल्याचे ते म्हणाले. लखनऊच्या विशेष न्यायालयाने बाबरी प्रकरणी लालकृष्ण आडवाणी, कल्याण सिंह, डॉ. मुरली मनोहर जोशी, उमा भारतींसह ३२ आरोपी कोणत्याही कटात सहभागी नव्हते असे म्हटले आहे. या निर्णयाचे मी स्वागत करतो. उशिरा का होईना पण न्यायाचा विजय झाला आहे, हेच या निकालाने सिद्ध केले आहे, असे राजनाथ सिंह यांनी ट्विट करत म्हटले आहे.

न्यायालयाने केली ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता

आज लखनऊच्या सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ज्या ३२ आरोपींंना निर्दोष सिद्ध केले त्यात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, महंत नृत्य गोपाल दास, कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, रामविलास वेदांती, धरम दास, सतीश प्रधान, चंपत राय, पवन कुमार पांडेय, ब्रजभूषण सिंह, जयभगवान गोयल, महाराज स्वामी साक्षी, रामचंद्र खत्री, अमननाथ गोयल, संतोष दुबे, प्रकाश शर्मा, जयभान सिंह पवेया, विनयकुमार राय, लल्लू सिंह, ओमप्रकाश पांडेय, कमलेश त्रिपाठी उर्फ सती दुबे, गांधी यादव, धर्मेंद्रसिंह गुर्जर, रामजी गुप्ता, विजयबहादुर सिंह, नवीनभाई शुक्ला, आचार्य धर्मेंद्र देव, सुधीर कक्कड आणि रविंद्रनाथ श्रीवास्तव यांचा समावेश आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.