ऑस्ट्रेलियाकडून भारतातून येणाऱ्या थेट प्रवाशी विमानांवर १५ मे पर्यंत बंदी

Share This News

नवी दिल्ली, २७ एप्रिल : भारतात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर होताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याआधी कॅनडा, ब्रिटन, सिंगापूर, न्यूझीलंड आणि मालदीव या देशांनंतर आता ऑस्ट्रेलियाने देखील भारतीय प्रवाशांना बंदी घातली आहे. कोरोना संसर्गाचा वेग पाहता भारतामधून येणाऱ्या थेट प्रवाशी विमानांवर ऑस्ट्रेलियाने १५ मे पर्यंत बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी मंगळवारी हा निर्णय घेतला. 
भारत सर्वाधिक लोकसंख्या असणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. तसेच सध्या भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अतिशय वेगाने होत आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.