मांजा, पतंग विक्रीवर बंदी घाला

Share This News

नागपूर : पतंगबाजी व पतंगविक्रीवर बंदी घालण्यात यावी, यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत रिपब्लिकन सेनेचे प्रदेश अध्यक्ष सागर डबरासे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. नायलॉन मांजाचा वापर या पतंगबाजीत मोठय़ाप्रमाणात होत असल्यामुळे यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मांजामुळे नागरिकांचे गळे, हात, पाय चिरले जात आहे. जीवही जात आहे. पशुपक्ष्यांचे प्राणसुद्धा या मांजामुळे जातात. नुकताच ३0 डिसेंबर रोजी आदित्य भारद्वाज याचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला होता. गंभीर स्वरूपात तो जखमी आहे. याव्यतिरिक्त कटलेली पतंग पकडण्याच्या नादात २९ डिसेंबर रोजी विकास तिरपुडे या सात वर्षांच्या मुलाला प्राण गमवावा लागला आहे. नायलॉन मांजावर बंदी घातल्यानंतरही हा मांजा विक्री केला जातो. या विरोधात कारवाई करण्याकरिता आवश्यक मनुष्यबळ नसल्याचे सागर डबरासे म्हणाले.



Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.