बंजारा समाज संजय राठोड यांच्या पाठिशी

Share This News

वाशीम : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर बंजारा समाज वनमंत्री संजय राठोड यांच्या पाठिशी उभा राहिलाआहे. यासंदर्भात महंत, संत मंडळीसह संपूर्ण समाज यासंदर्भातील निवेदन लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार आहे. पोहरादेवी पीठाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महंत, संत, नायक, कारभारी आणि समाजातील विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


पोहरादेवी पीठाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संजय राठोड यांच्या पाठिंब्याचा ठराव घेण्यात आला. राठोड यांच्याशिवाय अनेक मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. पोहरादेवी विकास आराखड्यासाठी अधिक निधीची तरतूद करण्याची मागणीही सरकारकडे करण्यात येणार आहे. बैठकीला महंत कबीरदास महाराज, महंत सुनील महाराज, महंत जितेंद्र महाराज, धर्मप्रचारक महंत शेखर महाराज, पोहरादेवीचे उपसरपंच विनोद महाराज, यवतमाळ जिल्हा परिषदेचे सदस्य लखनसिंग राठोड, यवतमाळ ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. संजय चव्हाण, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अनुकूल चव्हाण, सुनील राठोड, नीलेश राठोड आदी उपस्थित होते.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.