बँकांची कामे आटोपा २६ मार्चपूर्वी; ५ एप्रिलपर्यंत राहणार सुट्या

Share This News

नागपूर : राज्यातील कोणत्याही बँकेत तुमचे कोणतेही काम असेल तर ते शुक्रवार २६ मार्चपूर्वी आटोपून घ्या. कारण आर्थिक वर्षाच्या शेवटच्या आठवड्यानंतर सलग सुट्यांमुळे बँका थेट ५ एप्रिलला घडणार आहे.
मार्च अखेरमुळे बँकांमध्ये आर्थिक ताळेबंद तयार करण्यासाठी घाई सुरू आहे. अशात कोरोनामुळे अनेक ठिकाणी निर्बंध कडक असल्याने बँकांमधील उपस्थितीही रोडावली आहे. पेन्शन, निराधार योजनेचे मानधन आदींमुळे आता बँकांमध्ये गर्दी वाढत आहे. अशात बँकातील आर्थिक व्यवहार पूर्ण करायचे असल्यास ग्राहकांना सोमवार, २२ मार्चपासून केवळ पाच दिवसांचा कालावधी मिळणार आहे. त्यानंतर आठ दिवसांच्या सुट्या बँकांना राहणार आहेत. त्यामुळे बँकांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या ‘एट डे हॉलीडे’ची तयारी सुरू केली आहे.

अशा असतील सुट्या

  • २७ मार्च : दुसरा शनिवार
  • २८ मार्च : रविवारची सुटी
  • २९ मार्च : धुलीवंदनाची सुटी
  • ३० मार्च : मार्च अखेरचा दिवस
  • ३१ मार्च : सार्वजनिक व्यवहार बंद
  • १ एप्रिल : अकाऊंट क्लोजिंगचा दिवस
  • २ एप्रिल : गुड फ्रायडेची सुटी
  • ४ एप्रिल : रविवारची सुटी

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.