मे महिन्यात तब्बल १२ दिवस बँका रहाणार बंद

Share This News

नागपूर : आरबीआयने म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मे महिन्यात बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. यातील काही सुट्ट्या या राज्यापुरती मर्यादित आहे. तर काही सुट्ट्या या प्रादेशिक बँकांपुरत्या आहेत. त्यामुळे जर तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही काम असल्यास, तुम्हाला सुट्ट्यांबद्दलची माहित असणे आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्ही बँकेच्या सुट्टीच्या दिवशी बाहेर पडल्यात तर तुमची फेरी वाया जाणार आहे.
१ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे. त्यामुळे बहुतेक सरकारी संस्थांना सुट्टी आहे. तसेच याच महिन्यात ईद, अक्षय तृतीया आणि बुद्ध पूर्णिमा यासारखे सण येत आहेत. त्यामुळे या दिवशी बँकांना सुट्टी असणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या यादीनुसार, मे महिन्यात राष्ट्रीय सुट्टी, आठवड्याच्या सुट्ट्या अशा एकत्रित करुन एकूण ११ सुट्ट्या आहेत. नुकतंच याबाबत आरबीआयने rbi.org.in अधिकृत वेबसाईटवर याबाबतची यादी अपलोड केली आहे. त्यानुसार तुमची बँकांची काम सुट्टीची यादी पाहूनच करा, असे आवाहन आरबीआयने केले आहे.

मे महिन्यातील बँकेच्या सुट्टीची यादी

1 मे – शनिवार – महाराष्ट्र दिन / कामगार दिन
2 मे – रविवार – आठवड्याची सुट्टी
7 मे – शुक्रवार – जमात-उल-विदा (जम्मू आणि श्रीनगर)
8 मे – दुसरा शनिवार – आठवड्याची सुट्टी
9 मे – रविवार – आठवड्याची सुट्टी
13 मे – गुरुवार – ईद (ईदच्या उत्सवामुळे श्रीनगर, जम्मू, नागपूर आणि कानपूरमधील बँका बंद राहतील.)
14 मे – शुक्रवार – परशुराम जयंती / ईद / अक्षय तृतीया (जम्मू, मुंबई, नागपूर येथे या दिवशी बँका खुल्या असतील.)
16 मे – रविवार – आठवड्याची सुट्टी
22 मे – चौथा शनिवार – साप्ताहिक सुट्टी
23 मे – रविवार – आठवड्याची सुट्टी
26 मे – गुरुवार – बुद्ध पूर्णिमा
30 मे – रविवार – आठवड्याची सुट्टी.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.