ED कार्यालयासमोर ‘भाजप प्रदेश कार्यालय’ म्हणून शिवसैनिकांची बॅनरबाजी

Share This News

मुंबई : शिवसैनिकांनी मुंबईतील ED कार्यालयासमोरच “भाजप प्रदेश कार्यालय” म्हणून बँनर लावले आहेत. सेना भवनसमोर महिला शिवसैनिकांची ईडी व भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली. संजय राऊत (sanjay raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स पाठवल्यानंतर शिवसैनिक आता आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजप विरुद्ध शिवसेना (BJP vs Shivsena) लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

एकीकडे संजय राऊतांची पत्रकार परिषद सुरू असताना शिवसैनिकांनी मुंबईतल्या ईडी कार्यालयाबाहेर बॅनरबाजी केली… ईडी कार्यालयाबाहेर ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असं पोस्टर लावून शिवसेनेनं कृतीतून भाजप तसंच ईडीला टोला हाणला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली आहे

‘ईडीच्या माध्यमातून दबाव आणून सरकार पाडण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप संजय राऊत यांनी आज केला. गेल्या वर्षभरापासून आपल्यावर सरकार पाडण्यासाठी सातत्याने आपल्याला धमकावलं जात असल्याचा’ गंभीर आरोप त्यांनी केला आहे. 

‘ईडीच्या कार्यालयात गेल्या ३ महिन्यांपासून भाजपचे काही नेते सतत जात आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या २२ आमदारांची यादी आपल्याला दाखवण्यात आली. या २२ जणांना नोटीसा पाठवून नंतर अटकेची टांगती तलवार ठेऊन राजीनामे घेण्याचा कट रचला जात आहे.’ असा आरोप त्यांनी केला आहे. 

‘ईडीचा गेल्या महिन्याभरापासून आपल्याशी पत्रव्यवहार सुरू आहे. त्यांनी मागितलेली सर्व कागदपत्रं त्यांना आपण दिली पण हा संदर्भ त्यांनी सांगितला नाही, मग हे पीएमसी बँकेसंदर्भात आहे हे भाजपच्या माकडांना कसं समजलं.’ असा सवाल त्यांनी केलाय. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.