किरकोळ वादातून नागपुरात बापलेकांनी केली तरुणाची हत्या

Share This News

नागपूर : क्षुल्लक कारणावरून बापलेकांनी तरुणाची हत्या केली. ही घटना गुरुवार, १ मार्चच्या रात्री १० वाजताच्या सुमारास जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लष्करीबाग परिसरातील महाकश्यप बौद्ध विहाराजवळ घडली.
पीयूष किशोर भैसारे (वय २४) हे घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. हर्षद्र देवीदास जांभुळकर (वय ३४), भूपेंद्र देवीदास जांभुळकर (वय ३३), शैलेंद्र देवीदास जांभुळकर (वय २६) आणि देवीदास जेठाजी जांभुळकर (वय ६०) यांना याप्रकणी अटक करण्यात आली आहे.
पीयूष आणि हर्षद्र एकाच परिसरातील रहिवासी आहेत. हर्षद्रला दारूचे व्यसन असल्याचे पोलिसांनी सांगितले. धुळवडीच्या दिवशी तो दारू पिऊन होता. यावेळी हर्षद्र आणि पीयूष यांचा वाद झाला. त्याचा राग हर्षद्रच्या मनात होता. गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास पीयूष त्याचा मित्र रोहित वाघमारे याच्यासोबत जात होता. यावेळी आरोपींनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यात पीयूष ठार झाला. रोहितलाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.