नरनाळा किल्ल्यावरील बार्टीझन

Share This News

नरनाळा किल्ला हा फक्त ऐतिहासिक किल्ला नसुन विविध वास्तुशैलीचे अव्दितीय उदाहरण आहे. कील्यावरील दरवाजेही, तटबंदी, बुरुज आणि वास्तु आदींमध्ये तत्कालीन प्रगत वास्तुशैलीचा अत्यंत कल्पकतेने उपयोग केला आहे.
शहानुर गावातुन किल्ल्यावर चढत असतांना मधात छोटेसे पठार लागते.ऐतिहासीक भाषेत त्याला “मेट” असे म्हणतात. मेट म्हणजे किल्ल्याच्या चढणीवरील अर्धा टप्प्यावरील तटबंदी विरहीत पहारेकऱ्यांच्या वस्तिची आणि गस्तिची मोक्याची जागा. येथील बुरजामध्ये झरोके सदृश खिडक्या असुन या खिडक्यांमध्ये अत्यंत सुरेख पद्धतीने पोर्तुगीज वास्तुशैलीचा उपयोग केला आहे. पोर्तुगीज किल्ल्यांवरील बुरुजांवर एक विशिष्ट प्रकारचे बांधकाम आढळते.एखाद्या ताईताप्रमाणे किंवा लोडाप्रमाणे पण उभे म्हणजे कॅपसुल सारखें बांधकाम असते.त्यामुळे स्वतः लपून जंग्यांमधुन अनेक दिशांनी बाण व बंदुकींच्या गोळ्यांचा सहजपणे मारा करतायेतो.त्याच प्रमाणे तटबंदी लगतच्या शत्रुवर सुद्धा मारा करता येतो यालाच “बार्टीझन” असे नाव आहे. ( संदर्भ- अथातो दुर्गजिज्ञासा- प्र.के. घाणेकर ). या बुरुजाच्या मागील बाजूस गोंड राजांचे प्रतिक शरभशिल्प आणि मोगलांचे चिन्ह चाॅंद-तारा आहे . जवळच लपलेल्या दोन तोफा असुन खाली अकोट दरवाजा आहे.
संशोधन आणि संकलन:— संदीप सरडे


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.