नॉन कोविड रुग्णांमुळे बेड हाऊसफुल्ल

Share This News

दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. सुरुवातीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव तीव्र गतीने होत असताना रुग्णालयांमध्ये नॉन कोविड रुग्णांची संख्या तोकडी होती. परंतु कोरोनाबाधितांची संख्या कमी होताच ऑक्टोबरपासून नॉन कोविड रुग्णांची संख्या वाढली असल्याचे दिसून येत आहे.

प्राप्त माहितीनुसार शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) मध्ये सद्यस्थितीत नॉन कोविड रुग्णांसाठी असलेल्या एकूण बेडपैकी ६७ टक्के बेड हाऊसफुल्ल आहेत.
वातावरणातील बदलानंतर शहरात सर्दी, खोकला, ताप आदी आजारांचे रुग्ण वाढत चालले ओह. त्यामुळे खासगी आणि शासकीय हॉस्पिटलमध्ये नॉन कोविड रुग्णांची संख्या पुन्हा सामान्य होऊ लागली असल्याचे चित्र आहे. मेडिकल व मेयोमध्ये मोठय़ा प्रमाणात रुग्ण येत आहेत. या रुग्णालयांमध्ये शहरासह जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील रुग्ण मोठय़ा संख्येने उपचारार्थ येत असतात. या दोन्ही रुग्णालयांमध्ये डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल बनविण्यात आले आहे. कोरोनामुळे परिवहन व्यवस्था बंद झाली. तसेच संक्रमण वाढण्याच्या भीतीमुळे लोकांनी रुग्णालयांमध्ये येणे बंद केले होते. परंतु आता सर्वत्र अनलॉक झाल्याने व कोरोनाची भीती कमी झाल्यामुळे नॉन कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. मेडिकलमध्ये एकूण ३१ नॉन कोविड वॉर्ड आहेत. यात ८३७ बेड असून, यातील ५६३ बेड सध्यस्थितीत रुग्णांना देण्यात आले आहेत. अर्थातच ६७ टक्के बेड फुल्ल आहेत. तर केवळ ३३ टक्के बेडच शिल्लक (खाली) आहेत.
मेडिकलच्या ट्रामा सेंटरला डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल बनविले आहे. तिथे १ हजार बेड कोरोना संक्रमितांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. सध्या मेडिकलमध्ये १८७ कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहे आहे. उपचाराकरिता डॉक्टरांसोबत मेडिकलचा स्टाफ देखील ड्यूटीवर येत आहे. शिफ्टनुसार त्यांची ड्यूटी लावण्यात येत आहे. त्यांना सात दिवसाठी क्वॉरंटाईन करण्यात येते. वॉर्डात केवळ दिवसा परिचारिका ड्यूटीवर असतात. मेडिकमध्ये नर्सिंग स्टाफ खूप कमी आहे. यामुळे नॉन कोविड रुग्णांना पुरविण्यात येणार्‍या सुविधांवर याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.