वीज बिलात 2 टक्के सूट देण्याचा ‘बेस्ट’चा निर्णय

Share This News

मुंबई, 09नोव्हेंबर, ( : ग्राहकांना बिलात दोन टक्के सूट देण्याचा निर्णय ‘बेस्ट’ने घेतला आहे. ‘बेस्ट’ने घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात मार्चपासून लॉकडाऊन जाहिर करण्यात आला. लॉकडाऊन काळात भरमसाठ बील आल्याने अनेकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. आता ही बीलं भरायची कशी असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे पडला आहे. याच पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांना मदत करण्यासाठी तसेच वीज बिल भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ‘बेस्ट’ने ग्राहकांना बिलात दोन टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.नोव्हेंबर महिन्याचे वीजबिल तात्काळ भरलेल्या ग्राहकांना एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमधील वीज वापरावरील प्रदान आकार आणि वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज माफ करण्यात येणार आहे. तर, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या वीज वापराच्या बिलात 2 टक्के सूट देण्यात येणार असल्याचे समजते.तसेच जो ग्राहक नोव्हेंबर महिन्यातील वीजबिल नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीपर्यंत भरेल त्या ग्राहकास एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमधील वीज वापरावर विलंब शुल्क आणि व्याजात सूट देण्यात येणार आहे. या ग्राहकाला एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वीज वापराच्या बिलावर 1 टक्के सूट देण्यात येणार. या संबंधित महिन्यातील वीजबिलाचे तिन्ही हप्ते वेळेत भरल्यास व्याजाबाबत सूट दिली जाणार असल्याचे समजते.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.