भंडारा बालक मृत्यू प्रकरण,राजकीय नेत्यांनी व्यक्त केल्या संवेदना
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शाह,काँग्रेस नेते राहुल गांधी,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त करीत मृत बालकांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी — भंडारा येथे झालेली दुर्घटना अतिशय विदारक असून मृतांच्या कुटुंबियांना दुःख सहन कर्णयःची शक्ती ईश्वर देईल अशी प्रार्थना करीत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
ज्या कुटुंबांतील मुलांचा या घटनेत मृत्यू झाला त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना असं ,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी –
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि मन हेलावणारी आहे.ज्या कुटुंबांतील मुलांचा या घटनेत मृत्यू झाला त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत.
राहुल गांधी – भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग लागून १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त धक्कादायक आणि दुर्दैवी आहे.मृत व जखमींच्या कुटुंबियांना महाराष्ट्र सरकारने मदत करावी असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे.
विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस:
भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत सुमारे १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे.
या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी!
गृहमंत्री अनिल देशमुख :
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग लागून १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. सदर घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश मी भंडारा पोलिसांना दिले आहेत. आज मी स्वतः घटनास्थळी भेट देणार आहे.