भंडारा : पूरपीडित, प्रकल्पग्रस्त व अतिक्रमण धारकांचे भाकप तर्फे धरणे निदर्शने

Share This News

भंडारा-:  पुरपीडित व प्रकल्पग्रस्तांना मोबदला देऊन पुनर्वसन करा, अतिक्रमणधारकांना नियमानुकूल करा, जबरान जोतदारांना वन हक्क  कायद्यांतर्गत मालकी पट्टे द्या व भंडारा शहराच्या पिण्याच्या पाण्याची समस्या त्वरित सोडविण्यात यावे इत्यादी मागण्यांना घेऊन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ.हिवराज उके  यांच्या नेतृत्वात दि. 22 फेब्रुवारी ला  कलेक्टर कचेरीसमोर धरणे निदर्शने – आंदोलन करण्यात आले आणि भंडारा शहर आणि ग्रामीण जनतेच्या विविध मागण्यांचे निवेदन माननीय कलेक्टर साहेबांना देण्यात आले.त्यावर चर्चा करताना माननीय जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी-1) प्रकल्पग्रस्त ग्रामसेवक कॉलनी भंडारा च्या ऐच्छिक  पुनर्वसनाच्या प्रस्तावाचा त्वरित पाठपुरावा करण्यात येईल.2) खमारी बुटी येथील पूर पीडितांना 95  हजाराच्या मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.3) अतिक्रमण धारकांची घरे नियमानुकूल करण्यासाठी व पुरामुळे पडलेल्या घरांची यादी पाठविण्यात यावी. तसेच 4) भंडारा शहरातील  जनतेच्या पिण्याच्या पाण्याची समस्या त्वरित सोडण्यासाठी जबाबदारी फिक्स करण्याचे तसेच इतर प्रश्न सोडवण्याचे व शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.शिष्टमंडळात भाकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके , शेतमजूर युनियनचे सचिव कॉम्रेड रत्नाकर मारवाडे, गणेश चिचामे ,महादेव आंबा घरे, विजय वैद्य राकेश बल्लमवार, विनोद चित्रिव, कॉम्रेड प्रियकराला मेश्राम  व विलास केजरकर यांचा समावेश होता. तर कॉम्रेड सदानंद इलमे, गजानन पाचे, वामनराव चांदेवार, मनोज भजे ,दुर्गेश वाडीभस्मे ,दिनेश पवार ,श्रीकांत पांडे ,खुशाल साठवणे,  इत्यादींचे सहकार्य लाभले.शेवटी काॅ. हिवराज उके यांनी जिल्हाधिकारी साहेबांसोबत झालेल्या चर्चेची  माहिती दिली व झालेल्या चर्चेची तात्काळ अंमलबजावणी करण्याची अपेक्षा व्यक्त केली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.