भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुरु केली फिरती मोबाईल एटीएम व्हॅन | Bhandara District Central Bank launches mobile mobile ATM van

Share This News

भंडारा :- भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या फिरत्या मोबाईल एटी एम व्हॅनचे लोकार्पण  जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या हस्ते करण्यात आले असून ही मोबाईल व्हॅन ज्यात गावात बँक नाही असा  ठिकाणी जाणार आहे. तसेच  मोबाईल एटीएम व्हॅन ज्या गावात बँक नाही किंवा एटी एम नाही अशा दुर्गम भागात जाऊन तेथील नागरिकांना पैसे कुठल्याही बँकेतील पैसे काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठी मदत करणार आहे.  सोबतच या व्हॅन मध्ये बँकेचा एक कर्मचारी राहणार असुन नागरिकांना खाते उघडणे, कर्ज सुविधेबाबत माहिती देत जिल्हा बँक ही दुर्गम भागातील ग्राहकांपर्यंत पोहचणार आहे. सध्या एकाच व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले असुन सदर व्हॅनला नागरिकांना चांगला  या सेवेला प्रतिसाद मिळाला तर आणखी चार व्हॅन सुरु करण्यात येणार असल्याचे नाबार्डचे संदीप देवगिरकर यांनी यावेळी सांगीतले. जिल्हा बँक ही सर्वसामान्य नागरिकांची बँक असुन ग्राहकांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात जिल्हा बँक नेहमीच अग्रेसर राहीली आहे. मोबाईल एटीएम व्हॅनमुळे ही बँक ग्राहकांच्या गावापर्यंत पोहणार असुन इतर बँकेच्या ग्राहकांना सुद्धा ह्या मोबाईल एटीएम व्हॅनमधील एटीएम म्हणुन पैसे काढता येणार आहे, ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी केले आहे.

भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुरु केली फिरती मोबाईल एटीएम व्हॅन | Bhandara District Central Bank launches mobile mobile ATM van


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.