भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय जळीत प्रकरणामुळे आज भंडारा बंद
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय जळीत प्रकरणामुळे आता राजकारण रंगू लागले आहे. भाजपाचे खासदार सुनिल मेंढे यांनी सदर घटनेनंतर रूग्णालयाचे शल्य चिकित्सक,डाँक्टर आणि नर्स यांचेवर तात्काळ निलंबन करून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी केली होती.मात्र मागणी पुर्ण न झाल्यामुळे भाजपाच्या वतीने भंडारा जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला होता त्यानुसार आज भाजप चे खासदार सुनिल मेंढे यांच्या नेतृत्वात गोंदिया शहरात निषेध रैल्लीचे आयोजन करण्यात आले , भाजपाच्या हाकेला नागरीकांनी उत्तम प्रतिसाद देत सकाळपासून आपले दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. तर अत्यावश्यक दुकाने सुरू होती.