भंडारा जिल्हा रूग्णालय प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- पिडीत कुटुंबियांची मागणी
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेली कार्यवाही आम्हाला मान्य नाही, दोषी डॉक्टरनावर आणि स्टॉप वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून न्यायालयीन चौकशी करा अशी मागणी मृत मुलांच्या पालकानी केली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारीला मध्य रात्री नवजात मुलांच्या अतिदक्षता कक्षात लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा होरपडुन मृत्यू झाला होता, रुग्णालयातिल दोषी डॉक्टरांनवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा या मागणी साठी भंडारा जिल्हा भाजप तर्फे १५ जानेवारी पासुन भंडारा जिल्हाधीकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु आहे, काल आलेल्या अहवालात रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक आणि डॉक्टर वर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली तर नीवासी वैधकीय अधीकारी यांची बदली करण्यात आली आहे, तर कंत्राटी तत्वावर सेवा देणाऱ्या डॉ आणि नर्सवर सेवामुक्तीची कार्यवाही करण्यात आली आहे, या कार्यावाहीने मृत कुटुंबियाना न्याय मिळणार नाही . तर दोषी डॉक्टरवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे आणि मृतकाच्या कुटूंबियांनी केली आहे.