भंडारा : नगरसेविका व कामगारांत धक्का बुक्की, व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल 

Share This News

भंडारा, 05 फेब्रुवारी   : भंडारा नगर परिषदे अंतर्गत रस्त्याचे काम सुरु असून म्हाडा कॉलोनीत आधीचे  जुने काम न करता नवीन काम कंत्राटदारांनी सुरु करत असल्याने स्थानिक नगरसेविका यांनी विचारणा केली असता नगर सेविका व कामगारांत धक्का बुक्की झाली असून सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. भंडारा नगर परिषदेने मार्च पूर्वी शहरातील कामे पूर्ण करण्याचा धडाका सुरु केला आहे, तर नगर परिषदेने आर्या कंपनीला कामे देण्यात आली आहेत, मात्र या कंपनीने आधीची कामे अपूर्ण ठेवत नवीन कामाला सुरुवात केली असल्याने नागरिकांनी आधीची कामे पूर्ण करावी अशी मागणी केली आहे, वार्ड क्रमांक 8 मधील  नागरिकांनी याची माहिती स्थानिक नगर सेविका जयश्री बोरकर यांना दिली असताना नगरसेविका यांनी स्पॉट वर जाऊन कंत्राटदाराच्या मजुरांना काम करण्यासाठी थांबविला आहे, नगर सेविका यांनी आधीची अपुरी कामे पूर्ण करा नंतर नवीन काम सुरु करावा असे बोलताच मजुरांनी नगरसेविका व त्यांच्या पतीवर हल्ला चढविला आहे, तर नगर सेविका व त्यांच्या पतीने  कामगार यांच्यावर काम थांबविण्याचा दबाव आणला असं आर्या कंपनीच्या इंजिनियर यांनी सांगितले आहे,  दोन्ही पक्षात धक्काबुक्की झाली असल्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे, तर भंडारा शहर पोलीस स्टेशन मध्ये दोन्ही पक्षा विरुद्ध अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली असून पोलीस तपास  करीत आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.