भंडारा : नहराची पाळ फुटल्याने शेतात पाणीच पाणी,पिकांचे नुकसान
भंडारा,दि.06ः-बावनथडी प्रकल्पाच्या पाणी वाहून नेण्यासाठी असलेल्या माडगी परिसरातील नहराची पाळ फुटल्यामुळे शेतात पाणी शिरून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्पातून खापा तामसवाडी देव्हाडी भागातील शेतीला नहराचे द्वारे पाणी सोडले जाते. माडगी येथून जात असलेल्या या नहराची पाळ फुटल्या मुळे फेरो कंपनी पासून कौसल्या पेट्रोल पंपा जवळील शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून पिकाचे नुकसान झाले.
चना, लाखोरी, गहू ही पिके पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले. जवळपास २५ ते ३० शेतात पाणी शिरल्याने समजते. यात श्रीराम शेंडे, जगदीश पंचबुधे, लक्ष्मण कांबळे, भगवान कांबळे, मधू तिजारे, कोठीराम बुधे, भिवा हिंगे, संजय तांबे, कृष्ण तिजारे, अर्जुन हिंगे, सुरेंद्र सिंग या शेतकऱ्यांचा समावेश आहे. मागील वर्षा पासून या नहराला तडे गेले होते. तक्रार करून देखील कारवाई करण्यात न आल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जाते. दरम्यान ज्याचे नुकसान झाले त्यांना भरपाई देण्याची मागणी होत आहे. पाटबंधारे विभागाचे नहराच्या डागडूजी कडे दुर्लक्ष झाल्याने हा प्रकार घडला. शेतकऱ्यांनी सांगूनही त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला देण्यात यावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य के.के पंचबुधे यांनी केली आहे.