आज जरीपटका रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजन

Share This News

नागपूर : जरीपटका रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवार, २३ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३0 वाजता होणार आहे. याप्रसंगी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तर प्रमुख अतिथी म्हणून नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी व खासदार डॉ. विकास महात्मे, विधान परिषद सदस्य ना.गो. गाणार, गिरीश व्यास, प्रवीण दटके, अँड. अभिजित वंजारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत प्रस्तावित जरीपटका रेल्वे उड्डाणपूल ७४0 मीटर लांबीचा असून यासाठी ७८ कोटी ९२ लाख निधी खर्च अपेक्षित आहे.

ऑरेंज सिटी म्हणून ओळख असलेल्या नागपूर शहराचा चेहरा मोहरा बदलतोय. सर्वाधिक गतीने वाढणारे शहर म्हणून आता नागपूरची ओळख तयार होत आहे. नागपूर मेट्रो,विविध उड्डाणपूल, नवे गुळगुळीत सिमेंट रस्ते अशी ओळख शहराची होतेय.आत यात आणखी एक भर पडतेय व ती म्हणजे जरीपटका उड्डाण पुलाची. जरीपटका व सदर परिसराला जोडणारा रेल्वे पुल आता जीर्ण झाला आहे. हा पूल मोठ्या वाहनांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून बंद करण्यात आला आहे. उत्तर व  जोडणारा मुख्य रेल्वे मागच्या वर हा जुना पूल बांधण्यात आला होता. आता या ठिकाणी नवा उड्डाणपूल तयार होणार आहे. या नव्या उड्डाणपूलाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी होत आहे. ७८.९२ कोटी  रुपयांच्या या प्रस्तावित उड्डाणपुलाची एकूण लांबी ७४० मीटर एवढी असून फुटपाथ व अप्रोच रोड देखील यात राहणार आहे. केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग या पुलाचे निर्माण कार्य करणार आहे. या नव्या उड्डाण पुलामुळे सदर,जरीपटका,मेकोसबाग व गोधनी या परिसरातील नागरिकांना  रहदारीच्या समस्येपासून दिलासा मिळणार आहे. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.