मोठी दुर्घटना! तैवानमध्ये रेल्वे रुळावरून घसरली, 36 प्रवाशांचा मृत्यू तर 72 जखमी

Share This News

पूर्व तैवानमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. रेल्वे रूळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 36 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 72 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून वेगाने बचावकार्य सुरू आहे.  तैवानच्या परिवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रेल्वे रूळावरून एक ट्रेन घसरली. या दुर्घटनेत आतापर्यंत 36 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 72 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बचावकार्य वेगाने सुरू आहे. ट्रेनमधून जवळपास 350 प्रवासी प्रवास करत होते.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.