नासाच्या मंगळयानासमोर मोठे संकट! मंगळावरील वादळात टिकू शकेल का | Big crisis in front of NASA’s Mars! Can it survive the storm on Mars

Share This News

मुंबई : . तिथे विजेचा कडकडाट देखील जोरदार होतो. सोसाट्याचे वारे वाहतात. या वाऱ्यांचा वेग इतका असतो की, मंगळावरील मोठेमोठे दगड देखील विस्कळीत होतात. मंगळ ग्रहावर पुन्हा एकदा असेच धुळीचे वादळ येणार आहे. या वादळात जोरदार वीजा चमकू लागतील. मंगळ ग्रहावरील या धुळीच्या वादळामुळे, जांभळ्या रंगाचे वातावरण तयार होईल. या सगळ्यात नासाचे ‘मार्स पर्सिव्हरेन्स रोव्हर’ (NASA Mars Perseverance Rover ) हे यान या वादळापासून वाचेल का? किंवा हे दूरवरून त्या वादळाची सुंदर छायाचित्रे घेईल आणि पृथ्वीवर पाठवेल?, असे ना अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत (NASA Mars Perseverance Rover may face dust storm on mars).

ओरेगॉन युनिव्हर्सिटीचे भूगर्भशास्त्रज्ञ जोशुआ मेंडेज हार्पर यांनी सांगितले की, मार्स पर्सिव्हरेन्स रोव्हर ज्या जाजेरो क्रेटरमध्ये आहे, तिथे काही दिवसांपूर्वी देखील एक वादळ आले होते. आता पुढचे वादळ येईपर्यंत रोव्हरला कोणताही धोका नाही. परंतु, जेव्हा हे वादळ येईल तेव्हा मंगळ ग्रहाचा रंग बदलून जांभळा जाईल. रोव्हरच्या समोर, बर्‍याच वेळा वीजा चमकताना दिसू शकतील.

NASAचा हेतू सध्या होईल!

जोशुआ यांनी सांगितले की, हे लवकरच घडेल. म्हणूनच नासाने ज्या उद्देशाने मार्स पर्सिव्हरेन्स रोव्हरला मंगळावर पाठवले आहे, तो हेतूदेखील पूर्ण होईल. म्हणजेच आपल्याला मंगळावर वाढणारी वादळं, वीज, धूळ, इलेक्ट्रिक चार्ज इत्यादींचा अभ्यास करण्यास मिळेल.

मंगळाचा रंग बदलणार!

मंगळ ग्रह यावेळी जांभळ्या रंगाचा कसा होणार हा प्रश्न देखील आहे. तर, जेव्हा धुळीचे वादळ येते तेव्हा घर्षणामुळे धुळी कण विद्युत चार्ज होतात. जेव्हा, असे चार्ज केलेले कण एकमेकांना भिडतात, तेव्हा ते वेगवेगळ्या रंगांचे वातावरण तयार करतात. यावेळी छोट्या-छोट्या वीजा देखील तयार होतात. ही वीज नुकसान होण्यास इतकी मजबूत नसते, परंतु एकाच वेळी बऱ्याच विजा येऊ शकतात. हे दृश्य बहुधा ज्वालामुखी फुटल्यानंतर जसे दिसते, तसेच असेल (NASA Mars Perseverance Rover may face dust storm on mars).

पर्सिव्हरेन्सला जैविक घटक शोधण्याची संधी

जोशुआ म्हणाले की, मंगळावरील या वादळाचे परीक्षण करतांना मार्स पर्सिव्हरेन्स रोव्हरला मंगळावर जैविक घटक शोधण्याची संधी मिळेल. जर तो यशस्वी झाला, तर हा सर्वात मोठा शोध असेल. कारण, जेव्हा असे वादळ येते, तेव्हा ते आपल्याबरोबर निरनिराळ्या वस्तू घेऊन येते. अशा अनेक प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया आहेत, ज्या मंगळावर प्राचीनकाळात जीवन अस्तित्त्वात असल्याचा पुरावा देऊ शकतात.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.