मोठी बातमी ! केंद्र सरकारकने रेमडेसिव्हीर इंजेक्शनची निर्यात थांबवली

Share This News

देशात कोरोना रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. देशभरात कोरोना लसीची मोहीम सुरू आहे. मात्र लसीच्या तुटवड्यामुले काही ठिकाणी यात अडथळा निर्माण होताना दिसत आहे. तर, अनेक रूग्णांना आवश्यक असलेलं रेमडेसीवर इंजेक्शन उपलब्ध होत नसून, रूग्णांच्या नातेवाईकांना या इंजेक्शनसाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच, या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचंही बोललं जात होतं. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकाने रेमडेसीवरची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत कोरोना स्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत ही बंदी असेल, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.