भाजयुमो च्या कार्यकर्त्यांनी केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न
नागपूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी वाडी येथे ताफा रोखण्याचा प्रयत्न केला आहे. उपमुख्यमंत्री अमरावती वरून नागपूर बैठकीसाठी येत येताना घडली घटना आहे. वीज बिलांच्या संदर्भात भाजयुमो च्या कार्यकर्त्यांना निवेदन द्यायचे होते,मात्र अजित पवार यांचा ताफा न थांबता निघाल्याने भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न फसला आहे.