कार्यकर्त्यांवर कारवाईने नागपुरात भाजप संतप्त

Share This News

नागपूर : वीज बिलाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान वाडी पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईच्या मुद्द्यावर नागपुरात भाजप संतप्त झाली आहे. यासंदर्भात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेण्यात आली.
वीज बिलासंदर्भात भाजपच्या कार्यकर्त्यांनी ८ फेब्रुवारीला वाडी चौकात आंदोलन केले. त्यावेळी वाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ढवळे यांनी कार्यकर्त्यांना सराईत गुन्हेगारासारखी वागणूक दिल्याचा आरोप आमदार कृष्णा खोपडे यांनी केला. यासंदर्भात महापौर दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, आमदार गिरीश व्यास, आमदार विकास कुंभारे, आमदार मोहन मते, प्रदेश युवा मोर्चाच्या महामंत्री शिवानी दाणी, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष पारेंद्र पटले यांनी आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेत पोलिसांच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात आमदार खोपडे यांनी पोलिस उपायुक्त नुरूल हसन व सहाय्यक पोलिस निरीक्षक ढवळे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधत नाराजीही व्यक्त केली होती.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.