जेलभरो आंदोलन स्थगित, बावनकुळेंची मोठी घोषणा

Share This News

नागपूर : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रस्तावित आंदोलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. कोरोनाच्या संसर्गाच्यापार्श्वभूमीवर आंदोलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेत असल्याचं वानकुळे यांनी सांगितलंय. येत्या 24 तारखेला भाजपचे वाढीव वीज बिल माफीसाठी राज्यात 560 ठिकाणी आंदोलन होणार होते (BJP Protest) .परंतु राज्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहता हे आंदोलन स्थगित करण्याचा मोठा निर्णय बावनकुळे यांनी जाहीर केला आहे.राज्यातील 560 ठिकाणी वाढीव वीज बिलाविरोधात जेलभरो आंदोलन करुन सरकारला घेरण्याचा प्लॅन भाजपने आखला होता. 50 हजार कार्यकर्ते जेलमध्ये जातील असं नियोजन भाजपने केलं होतं. परंतु सध्याची कोव्हिड परिस्थिती पाहता हे आंदोलन स्थगित केल्याची घोषणा बावनकुळे यांनी केली आहे.

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली आणखी कठोर करण्यात येतीय. राज्यातल्या शहरी आणि भागांत रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे विविध कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आलीये. या कार्यक्रमांमध्ये सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.