उधार राजाचे जाहीर आभार.!

Share This News

विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस:

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरात दाखल होत गोसेखुर्द प्रकल्पाच्या निर्मितीपासून आजपर्यंत झालेले काम तसेच या प्रकल्पामुळे विकसित होणारी सिंचनक्षमता याबाबतची संपूर्ण माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याबाबत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना टोला लगावला.त्यांच्या या दौऱ्याबाबत फडणवीसांनी ट्विट केलं. मुख्यमंत्री यांचा अधिवेशन वगळता १४ महिन्यातील आज पहिला नागपूर दौरा. या दौऱ्यापूर्वी कालच शेतकऱ्यांच्या अंतिम मदतीचा जीआर जारी करण्यात आला. पूर्व विदर्भातील ६ जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रचंड अशी ११ कोटी रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली. ‘उधार‘राजाचे जाहीर आभार!”, असा टोला त्यांनी लगावला. तर गोसेखुर्द प्रकल्प यापुढे न रखडता सर्व घटकांच्या सहकार्याने डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण झाला पाहिजे. यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे नियोजन करावे. हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करून विदर्भातील जनतेस सिंचनासाठी मोठा लाभ मिळवून देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.