नागपूर : महापौर व उपमहापौर पदासाठी भाजपतर्फे नामांकन दाखल, कॉंग्रेस निवडणुकीच्या रिंगणात
नागपूर महानगर पालिकेच्या उपमहापौर पदाचा गुंता अखेर सुटला आहे, भाजपा नगरसेविका मनीषा धावडे य भाजपच्या उपमहापौर पदाच्या उमेदवार असणार आहेत, तर दुसरीकडे कॉंग्रेस देखील महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक लढवल्या जाणार आहे.
संदीप जोशी यांनी महापौर पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपमहापौर मनीषा कोठे यांनी देखील राजीनामा दिला होता. भाजपच्या पूर्वी ठरलेल्या फॉर्म्युलानुसार संदीप जोशी यांच्या राजिनाम्या नंतर भाजप चे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी हे महापौर पदी विराजमान होणार हे निश्चित होते. परंतु उपमहापौर पदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अशात बुधवारी सकाळी महापौर पदासाठी भाजप तर्फे दयाशंकर तिवारी तर उपमहापौर पदासाठी प्रभाग 23 ‘ब’ च्या भाजप नगरसेविका मनीषा धावडे यांनी नामांकन अर्ज दाखल केले. तर दुसरीकडे भाजप चा विजय निश्चित असूनही कोंग्रेसकडून देखील महापौर व उपमहापौर पदाचे उमेदवार देऊन निवडणूक लढवली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कोंग्रेस तर्फे महापौर पदासाठी रमेश पुणेकर तर उपमहापौर पदासाठी रश्मि धुरवे रिंगणात राहणार असल्याची माहिती आहे. 151 नगरसेवक असलेल्या नागपूर महानगर पालिकेत भाजपचे 108,कोंग्रेसचे 29, बहुजन समाज पक्षाचे 8, शिवसेनेचे 2 तर राष्ट्रवादी व अपक्ष असे प्रत्येकी एक नगरसेवक आहेत.