उत्तराखंड : भाजपचे आ. सुरेंद्र सिंह जीना यांचा कोरोनामुळे मृत्यू
नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर, : उत्तराखंड मधील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह जीना यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्यावर दिल्लीतील सर गंगाराम रूग्णालयात उपचार सुरू होते.मात्र आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या निधनाने राजकीय नेत्यांकडून दुःख व्यक्त केले जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचे ही निधन झाले होते.
सुरेंद्र सिंह जीना हे अल्मोडा जिल्ह्यातील सल्ट निर्वाचन क्षेत्रातील लोकप्रिय आमदार होते. सलग तीन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले होते.