वाढीव वीज बिलाविरुद्ध भाजपने ठोकले टाळे

Share This News

वाढीव वीज बिलाविरुद्ध आज नागपुर शहरात भाजपतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान ‘वीज वितरण’ कार्यालयांना भाजपतर्फे आज टाळे ठोकण्यात आले. लॉक डाऊन च्या काळात वीज ग्राहकांना वाढीव वीज बिले अली आहेत. हि बिले माफ करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती परंतु वीज बिल काही माफ करण्यात आले नाही किंवा त्यात सूटही देण्यात आली नाही. उलट ज्या ग्राहकांनी आतपर्यंत वीज बिल भरले नाही त्या ग्राहकांना वीज कनेक्शन कापण्याची  नोटीस पाठवण्यात येत आहेत. त्याविरुद्ध भाजपतर्फे आज राज्यव्यापी ‘टाळे ठोको’ आंदोलन करण्यात आले. कोराडी येथे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे  नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. तर तुळशीबाग येथे शहर अध्यक्ष प्रवीण दटके व महापौर दयाशंकर तिवारी  आंदोलन करण्यात आले. शहरातील सहाही  विधानसभा क्षेत्रात भाजप आमदार,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांना टाळे ठोकले.शिवाय वीज बिल माफ करण्याची मागणीही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.