नागपुरात गृहमंत्र्यांच्या घराबाहेर भाजपची निदर्शने

Share This News

नागपूर : मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर भारतीय जनता पार्टीने राज्यभरात आक्रमक आंदोलन सुरू केले आहे.
रविवारी, २१ मार्चला भाजपच्या कार्यकर्त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सिव्हिल लाइन्स येथील निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. गृहमंत्र्यांच्या निवासाबाहेर आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी येथे बॅनर जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी सुमारे २५ ते ३० भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमवीर सिंह यांनी गंभीर आरोप केल्यांनतर गृहमंत्र्यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानाबाहेरील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. गृहमंत्र्यांचे नागपुरात शिबिर कार्यालयही आहे. तेथेही पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. अशात भाजपच्या कार्यकर्त्यांनी गृहमंत्र्यांच्या नागपुरातील सिव्हिल लाइन्सस्थित निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत धडक दिलीच.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.